Get All MPSC News on your Email

Email     

Exam Paper Search

Monday, January 31, 2011

Maharashtra Public Service Commission - Generales Knowledge - Nick Names of Important India

 Title of Article : Nick Names of Important India
 Article Link : http://www.Allexampapers.com/cms/mpsc/mpsc_2351.htm

Maharashtra Public Service Commission - Exam Papers - common -wealth 2010 games : question & answers

 Title of Article : common -wealth 2010 games : question & answers
 Article Link : http://www.Allexampapers.com/cms/mpsc/mpsc_2350.htm

महाराष्ट्राचे संत - संत रामदास


“शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वशिष्ठापरि ज्ञान योगेश्र्वराचे। कवि वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरू रामदासा।।”

परमार्थ, स्वधर्मप्रेम, राष्ट्रप्रेम, संघटन, प्रबोधन, समाजकारण, राजकारण, प्रपंच, काव्य, साहित्य, बलोपासना अशा अनेक विषयांचे सर्वस्पर्शी कर्ते, भाष्यकार आणि द्रष्टे, पुरोगामी राष्ट्रसंत म्हणजे समर्थ रामदास स्वामी!

श्री समर्थ रामदासांचा जन्म मराठवाड्यातील जांब येथे ठोसरांच्या घरात झाला. हे सूर्योपासक घराणे होते. समर्थांचे पाळण्यातले नाव नारायण. बालपणापासून नारायण आपल्या विचारांनी, आचारांनी असामान्य वाटत होता. नारायणाने लग्नाच्या बोहल्यावरून आत्मोध्दारासाठी नाशिक पुण्यक्षेत्री धाव घेतली. दक्षिण गंगा गोदावरीचा पावन परिसस्पर्श अनुभवला व प्रभू श्रीरामचंद्राचे सान्निध्यही अनुभवले. गायत्रीमंत्राचे पुरश्र्चरण व रामनामाचे १२ कोटी वेळा नामस्मरण करून अवतार कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभू श्रीराम हेच त्यांचे सद्‌गुरू झाले.

‘धर्म संस्थापना जगजीवना। भरतखंडी करणे असे।’ यासाठी त्यांनी कठोर तपाचरण केले. टाकळी येथे संगमावर १२वर्षे तपाचरण केले. ‘श्रीराम जयराम जय जय राम’ हा मंत्र धारण केला. भारतभर तीर्थयात्रा केल्या. संपूर्ण देश पाहून परिस्थितीचा अंदाज घेतला. ‘मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा।’ यासाठी त्यांनी काया झिजविली. हरिकथा निरूपण, राजकारण; सावधपण व साक्षेप या तत्त्वांच्या आधारे कार्य करणारा ‘रामदासी’ संप्रदाय त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून संघटना बांधत, त्यांनी कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

समर्थ रामदासांच्या ‘जय जय रघुवीर समर्थ’ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. दर्‍या-खोर्‍यातून; डोंगर कपारीतून एकच नाद घुमला. सह्याद्रीच नव्हे तर गंगा-यमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली. आसेतुहिमाचल मठ-महंत निर्माण करून, नि:स्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्याला पूरक असे कार्य साधले. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भारून टाकली. प्रभू श्रीरामचंद्र, आदिशक्ती तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुतीराया या तीन देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला. समर्थांनी स्थापन केलेल्या केवळ श्री मारूती मंदिरांचा (त्या संख्येचा) अंदाज जरी आपण घेतला, तरी आपल्याला थक्क व्हायला होते. अक्षरश: शेकडो मंदिरांची स्थापना त्यांनी केली. स्वत: डोंगरदर्‍यात, घळीत राहून समाजाचे व देशाच्या कल्याणाचेच चिंतन केले. समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ, निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा, आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश केला. आनंदवनभुवनाचे स्वप्न पाहिले. हिंदुस्थान बलसंपन्न व्हावा यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज जागविले.

‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे। परंतु, तेथे अधिष्ठान पाहिजे। भगवंताचे।’ या त्यांच्याच सूत्रानूसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन स्वराज्य बलशाली व्हावे म्हणून समाजसंघटन करून राष्ट्रउभारणीच्या कार्याला मोलाची मदत केली. सहिष्णू व जयिष्णू धर्माचा समन्वय साधून रामराज्याचा मंत्र जागविला.

समर्थांनी राष्ट्रउभारणीसाठी जसे बहुमोल मार्गदर्शन केले तसेच लोकशिक्षण, प्रपंच, परमार्थ, विवेक या गोष्टींवरही भर दिला कारण यातूनच राष्ट्र उभे राहते, स्वराज्य स्थापन होते. लोकांनी साक्षर व्हावे यासाठी त्यांनी लिहिण्याची , वाचण्याची मोहीम काढली. आपल्या वचनात ते म्हणतात- ‘दिसा माजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे’ त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले -
जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।।

प्रपंच सोडून जर परमार्थ केला, तर केवळ आत्मोन्नती होईल परंतु प्रपंच करून परमार्थ केला, तर राष्ट्रोन्नती होईल म्हणून ते म्हणतात की -
प्रपंची जे सावधन। तोचि परमार्थ करील जाण।
प्रपंची जो अप्रमाण। तो परमार्थी खोटा।।

समर्थांनी साहित्य, कला, आरोग्य, जीवनशैली, निसर्ग, बांधकाम, उद्योग या विषयांवरही लिहिले आहे. जीवनाचे कोणतेही अंग समर्थांनी सोडलेले नाही. सर्वच क्षेत्रांत उच्च ध्येय गाठण्यासाठी, यश मिळवण्यासाठी काय करावे, याचे तपशीलवार मार्गदर्शन समर्थ करतात.
परळी येथे मठस्थापना करताना मठाच्या परिसरात बाग करण्यात येत होती त्या वेळी त्यांनी बागेवरती एक अखंड प्रकरणच लिहीले. तसेच सामानगडावर किल्ले बांधताना लिहिलेल्या ‘कारखाने’ या प्रकरणाच्या पहिल्या समासात विटा कशा कराव्यात, बांधकाम या प्रकरणात मजुरांना कशी , किती कामे द्यावीत यासारखी सर्व माहिती त्यांनी दिली आहे.

याशिवाय गाणे कसे असावे हे सांगताना समर्थ लिहितात,
बाळके श्वापदे पक्षी। लोभती वेधती मनी।
चित्त निश्चिंत होतही। धन्य ते गायनी कळा।।
मराठी (प्राकृत) भाषेचा अभिमानही समर्थ व्यक्त करतात. समर्थ लिहितात,

‘येक म्हणजी मर्‍हाठी काय। हे तो भल्यासी ऐको नये।
ती मूर्ख नेणती सोय। अर्थान्वयाची।।
लोहाची मांदूस केली। नाना रत्ने साठविली।
ती अभाग्याने त्यागिली। लोखंड म्हणोनी।
तैसी भाषा प्राकृत।।’

असे अनेक विषय त्यांच्या साहित्यात आहेत. समर्थांची मराठी भाषा ही मोजक्याच पण ठसठशीत शब्दांत सर्व काही सांगणारी भाषा आहे. समृद्ध शब्दरचना, मराठी शब्दांची वैभवशाली उधळण, तर्कशुद्ध विचारांची रेखीव, नेटकी मांडणी आणि माणसाच्या जीवनाचे, अगदी छोट्या-छोट्या व्यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण (अन्‌ त्याचे प्रकटीकरण) ही समर्थांच्या साहित्याची आणखी काही वैशिष्ट्ये! विशिष्ट लय, गेयता हीदेखील त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये होत. त्यामुळे अगदी सर्वसामान्यांना पण त्यांचे काव्य सहज मुखोद्गत होते. त्यांच्या साहित्यातील प्रत्येक वचन हे स्वानुभवातून आलेले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाला वजन आहे. समर्थांची काव्यरचना आणि तिचे साहित्यगुण हा खरे तर स्वतंत्र अभ्यासाचाच विषय आहे.

विविध विषयांतून लीलया समाजप्रबोधन करणार्‍या समर्थांचे हे सर्व करीत असताना मुख्य उद्दिष्ट होते हिंदवी स्वराज्य! त्यासाठीच त्यांनी देशात हलकल्लोळ माजवला. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीचा पाया भक्कम करण्याचे काम समर्थांमुळे सोपे झाले आणि या महाराष्ट्राच्या भुवनी आनंदवन उदयास आले.

सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थ स्थापित राम मंदिर, अकरा मारूतींची मंदिरे याच परिसरात आहेत. ‘दासबोधा’ चे लेखन त्यांनी रायगडाजवळील शिवथरघळीत बसून केले. चाफळ परिसरात समर्थांची व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. परमार्थ, अध्यात्म, श्रीराम व श्रीहनुमान भक्ती आणि संपूर्ण समाजाचा ‘नेटका प्रपंच’ या सर्वच बाबतीत स्वत: अत्युच्च स्थान गाठून समाजाला मार्गदर्शन करणार्‍या (आजही मार्गदर्शक ठरणार्‍या) समर्थांनी इ.स. १६८१ मध्ये सज्जनगडावर समाधी घेतली.

जय जय रघुवीर समर्थ!

समर्थांचे वाङ्‌मय:
`श्रीमत्‌ ग्रंथराज दासबोध’ या पारमार्थिक ग्रंथाची रचना शिवथरघळ (महाडजवळील) येथे केली.
आत्माराम ग्रंथ, मनाचे श्र्लोक (मनोबोध), करुणाष्टके, सवाया, अभंग, पदे-चौपदी.
काही स्‍फूटरचना, भीमरूपी, मारुतीस्तोत्र, अनेक आरत्या .

महाराष्ट्राचे संत - संत तुकाराम

संत तुकाराम
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निभिर्र्ड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदांत तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहे. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक, सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतातच,तसेच त्यांचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठात आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे.

‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा।।’ असे परखड वक्तव्य तुकोबाराय अभिमानाने व्यक्त करतात. ‘तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदांत वाहे पाणी।।’ भक्ती -ज्ञान-वैराग्य याने ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणी परब्रह्माच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते. ते विटेवरचे सावळे परब्रह्म सगुण साकार होऊन, स्वत:ला तुकोबांच्या ‘अभंग-भक्तिरसात’ बुडवून घेण्यात धन्यता मानते.

‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।’ असे म्हणत, शब्दांवर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले, जातिभेदावर टीका केली, श्रीविठ्ठलावरची भक्ती प्रकट केली, अध्यात्माचे सार सांगितले. देश-काळ-लिंग भेदाच्या पलीकडे त्यांची काव्य प्रतिभा झेपावलेली आपल्याला दिसते. ‘विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ।।’ या भूमिकेचा त्यांनी १७ व्या शतकात प्रसार केला. सांप्रदायिक आभिनिवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव, समता प्रस्थापित केली.

भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य यांच्या शब्दकळेत पाझरते. त्यांचे अभंग म्हणजे ‘अक्षर वाङ्‌मय’ आहे. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.

एका शुचिष्मंत घराण्यात पुणे जिल्ह्यातील देहू येथे शके १५३० मध्ये (इ. स. १६०८) वसंत पंचमी (माघ शु. पंचमी) या दिवशी त्यांचा जन्म झाला. नुकतीच इ. स. २००८ या वर्षी त्यांच्या जन्माला ४०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले आहे. यांच्या घराण्यातील विश्र्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. त्यांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांच्यावरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवडी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

तुकोबारायांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात आपत्तीचे तडाखे सहन करावे लागले. अनेक दु:खे सहन करावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली, या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्र्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला, परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला.
भामगिरी पाठारी वस्ती जाण केली। वृत्ती स्थिरावली परब्रह्मी।।
सर्प, विंचू, व्याघ्र अंगाशी झोंबले। पिडू जे लागले सकळीक।।
पंधरा दिवसामाजी साक्षात्कार झाला। विठोबा भेटला निराकार।।
या शब्दांत त्यांच्या तपश्र्चर्येचे वर्णन केलेले आढळते.

सतत, अनंत, अथांग विठ्ठलभक्ती आणि ती केवळ अंत:करणात व वाणीत नव्हे, तर कृतीतूनही व्यक्त करणे हेच संत तुकारामांचे जीवन होते. ‘पंढरीची वारी आहे माझ्या घरी। आणिक न करी तीर्थव्रत।।’ या वचनावरून पंढरपूरचे त्यांच्या जीवनातील स्थान लक्षात येते. पांडुरंग हेच त्यांचे दैवत होते.

वेद, गीता, भागवत, ज्ञानेश्र्वरी, पुराणांचा त्यांचा अभ्यास होता हे दिसून येते. अस्सल मराठमोळी भाषा हे त्यांच्या रचनांचे मुख्य वैशिष्ट्य होय. वैराग्याच्या कसोटीवरचा आत्मानुभव अनंत गुणांनी त्यांच्या अभंगवाणीत प्रगट झाल्याचा दिसतो. त्यांच्या रचनांतून श्रीविठ्ठलभक्तीसह संत-गुणवर्णन; कर्मठपणा व अंधश्रद्धेवर प्रहार; दांभिक-पाखंडी-खोट्या साधूंवर टीका; विशुद्ध पारमार्थिक जीवन जगण्यासाठीची सूत्रे इत्यादी अनेक विषय समोर येतात. त्यांच्या काही अभंगांच्या एकेका चरणावरूनही एक समृद्ध आशय आपल्यासमोर येतो.
उदाहरणार्थ,
‘‘जे का रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुले।।
तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।’’
‘‘संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ। नाही तळमळ दु:खलेश।।’’
‘‘तुका म्हणे तोची संत। सोशि जगाचे आघात।।’’
‘‘महापुरे झाडे जाती। तेथे लव्हाळे वाचती।।’’
‘‘ऐसी कळवळयाची जाति। करी लाभाविण प्रीती।।’’
‘‘सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे।।’’
‘‘शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी।।’’

तुकोबांचे हे अभंग समाजातील सर्व स्तरांत इतके झिरपले आहेत, की असंख्य लोकांच्या मुखांतून त्याचे चरण सहजगत्या बाहेर पडतात. अनेक चरण हे मराठी भाषेतील सुविचारच बनून गेले आहेत. अवघ्या ४१ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी सुमारे ५००० अभंगांची रचना केली. प्रत्येक क्षण त्यांनी भक्तीने व नामसंकीर्तनाने जागविला.
‘आम्ही जातो आमुच्या गावा। आमुचा राम राम घ्यावा।।’, असे म्हणत तसेच,
सकळही माझी बोळवण करा। परतोनि घरा जावे तुम्ही।।
वाढवेळ झाला उभा पांडुरंग। वैकुंठा श्रीरंग बोलावतो।।
आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी।।
अंत:काळी विठो आम्हासी पावला। कुडीसहित झाला गुप्त तुका।।

असे म्हणत ते फाल्गून वद्य द्वितीया शके १५७१ मध्ये (इ. स.१६४९) ब्रह्मलीन झाले. (शके पंधराशे एकाहत्तरी। विरोधक्ष नाम संवत्सरी। फाल्गुन वद्य द्वितीया सोमवारी। प्रथम प्रहरि प्रयाण केले।। अशी नोंद आढळते.)

श्रीसंत तुकारामांचे सार्थ वर्णन कवी वामन पंडित यांनी पुढील शब्दांत केले आहे.

जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी। म्हणावे कसे हो तया लागी वाणी।।
परब्रह्मरूपी असा जो तुकावा। तयाचे तुकी कोण दुजा तुकावा।।

Maharashtra Public Service Commission - Current Affairs - Rashtrapati Bhavan and Names of Presidents

 Title of Article : Rashtrapati Bhavan and Names of Presidents
 Article Link : http://www.Allexampapers.com/cms/mpsc/mpsc_2349.htm

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनक्रम


(जन्म-शके १८०५ वैशाख कृ ६ || निर्वाण- शके १८८७ फाल्गून शु.६)

१८८३ मे २८ जन्म भगूर गाव(जि. नाशिक).
१८९२ मातृ निधन.
१८९८ मे देवीपुढे सशस्त्र क्रांतीची शपथ.
१८९९ सप्टें ५ पितृनिधन.
१९०० जाने १ मित्रमेळ्याची स्थापना.
१९०१ मार्च विवाह.
१९०१ डिसे.१९ मैट्रिक परीक्षा उत्तीर्ण.
१९०१ जाने.२४ पुणे येथील फर्गसन महाविद्यालयात प्रवेश.
१९०४ मे. अभिनव भारत या आंतरराष्ट्रीय क्रांतीसंस्थेची स्थापना.
१९०५ दसरा विदेशी कपडयांची होळी.
१९०५ डिसे.२१ बी.ए. परीक्षा उत्तीर्ण.
१९०६ जून ९ लंडनला प्रयाण.
१९०७ मे १० १८५७ च्या स्वातंत्र-युद्धाचा लंडनमध्ये सुवर्ण महोत्सव.
१९०७ जून मॅझिनीचे चरित्र प्रसिद्ध केले.
१९०८ मे २ लंडनमध्ये प्रथम शिवजयंत्युत्सव.
१९०८ हॉलंडमधे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर(इंग्रजी) गुप्तपणे छापले.
१९०९ मे बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण,पण पदवीस नकार.
१९०९ जून वडील बंधु श्री.बाबाराव यांना जन्मठेप-काळेपाणी-शिक्षा.
१९०९ जुलै धिंग्राकृत कर्झन वायलीचा वध.
१९०९ आक्टो.२४ लंडनमधे दसर्‍याचा उत्सव, अध्यक्ष--- बॅ.गांधी.
१९१० मार्च १३ पॅरिसहून लंडनला येताच अटक.
१९१० जुलै ८ मार्सेलीस बंदरात समुद्रात उडी.
१९१० डिसे.२४ जन्मठेप काळ्यापाणीची शिक्षा.
१९११ जाने.३१ दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा.
१९११ जुलै ४ अंदमानच्या कारावासास(एकलकोंडीत) प्रारंभ.
१९१९ एप्रिल (बाबारावांच्या पत्नी)सौ.येसुवहिनींचे निधन.
१९२० नोव्हें. धाकचे बंधु डा. नारायणरावांची अंदमान-कारागृहात जाऊन भेट.
१९२१ मे.२ बाबाराव आणि तात्याराव दोघांची अंदमानातून हिंदुस्थानांत पाठवणी.
१९२१ नि १९२२ अलिपूर(बंगाल) नि रत्नागिरी येथील बंदिवास.
१९२३ मुंबईचे राज्यपाल लाईड जार्ज यांची सावरकरांच्या मुक्ततेविषयी चर्चा.
१९२४ जाने.६ राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यात. राहणे या दोन अटींवर येरवडा कारागृहातुन सुटका.
१९२५ जाने.७ कन्या “प्रभात” हिचा जन्म.
१९२६ जाने.१० हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ ‘श्रद्धानंद’ साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
१९२७ मार्च १ रत्नागिरीस गांधीजी-सावरकर भेट नि चर्चा.
१९२७ मार्च १७ पुत्र “विश्वास” याचा जन्म.
१९३० नोव्हें १६ रत्नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन
१९३१ फेब्रु.२२ पतित-पावन मंदिरात श्री. लक्ष्मी-नारायण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा.
१९३१ फेब्रु २५ मुंबई इलाखा अस्पृश्यता-निवारक-परिषद अधिवेशन ६ वे अध्यक्ष.
१९३१ एप्रिल २६ सोमवंशी महार-परिषद- अध्यक्ष. पतित-पावन मंदिरात सभा.
१९३१ सप्टें २२ नेपाळ-राजपुत्र हेमसमशेर जंगबहादुर राणा यांनी भेट दिली.
१९३१ सप्टें १७ श्रीगणेशोत्सवात भंगीबुवांचे कीर्तन.महाराचा गीतापाठ
नि ७५ स्पृश्या- स्पृश्य महिलांचे पहिले सहभोजन.
१९३७ मे १० रत्नागिरी स्थलबद्धतेतून विनाअट संपूर्ण मुक्तता.
१९३७ डिसे.३० हिंदु महासभा १९ व्या अ. भा. अधिवेशनाचे अध्यक्ष,कर्णावती.लागोपाठ सात वर्षे अ.भा.हि.म. सभेच्या अध्यक्षपदीं निवड.
१९३८ एप्रिल १५ ‘महाराष्ट्र-साहित्य-संमेलन’ २२ वे अधिवेशन,मुंबई, अध्यक्ष.
१९३९ फेब्रु १ निजाम विरोधी ‘भागानगरचा निःशस्त्र प्रतिकार’ प्रारंभ.
१९४१ जून २२ सुभाषचंद्र बोस अवचित सावरकर-सदनात येऊन भेटले.
१९४१ डिसे.२५ भागलपूरचा नागरिक-सभा-स्वातंत्र्यार्थ लढा.
१९४३ मे २८ ६१व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात अ.भा. सत्कार आणि निधी समर्पण.
१९४३ आगस्ट १४ नागपूर-विद्यापीठाने डी. लिट. ही सन्मान्य पदवी दिली.
१९४३ नोव्हें ५ अखिल महाराष्ट्र नाट्य-संमेलन अध्यक्ष.
१९४५ मार्च १६ वडील बंधु श्री.गणेशपंत(तथा बाबाराव) यांचे निधन, सांगली.
१९४५ एप्रिल १९ अ.भा. संस्थान-हिंदूसभा-अधिवेशन(बडोदे) अध्यक्ष.
१९४५ मे ८ कन्या ‘प्रभात’ चा विवाह, पुणे.
१९४६ एप्रिल मुंबई सरकारनं संपूर्ण सावरकर-वाङमयावरील बंदी उठवली.
१९४७ आगस्ट १५ दुख:मिश्रित आनंद! घरावर भगवा ध्वज नि राष्ट्र- ध्वज उभारले.
१९४८ फेब्रु. ५ गांधी-वधानंतर सुरक्षा-निर्बंधान्वये अटक.
१९४९ फेब्रु १० गांधी-वध अभियोगातून निष्कलंक सुटका.
१९४९ आक्टो १९ धाकटे बंधु डा. नारायणराव यांचे निधन.
१९४९ डिसे. अ.भा.हि.म. सभा, कलकत्ता- अधिवेशनाचे उद्- घाटक.
१९५० एप्रिल ४ पाक पंतप्रधान लियाकत अली ची दिल्ली भेट म्हणून अटक नि बेळगाव कारागृह-वास.
१९५२ मे १०-१२ ‘अभिनव-भारत’ संस्थेचा सांगता-समारंभ, पुणे.
१९५५ फेब्रु. रत्नागिरीच्या पतित-पावन मंदिराच्या सुवर्ण महोत्सवाचे अध्यक्ष.
१९५६ जुलै २३ लो.टिळक जन्मशताब्दी महोत्सव,पुण्यात भाषण.
१९५६ नोव्हें १० अ.भा.हि.म. सभा,जोधपूर- अधिवेशनाचे उद्-घाटक.
१९५७ मे १० दिल्लीत १८५७ च्या स्वातंत्र्युद्ध-शताब्दी महोत्सवात भाषण.
१९५८ मे २८ ७५ वा वाढदिवस. मुंबई महापालिकेकडून सत्कार.
१९५९ आक्टो ८ पुणे विद्यापीठाने ‘डी-लिट’ सन्मान्य पदवी(घरी येऊन) दिली.
१९६० डिसें. २४ मृत्युंजय-दिन-साजरा(या दिवशी ५०वर्षे जन्मठेप संपत होती).
१९६१ जाने.१४ मृत्युंजय-दिनानिमित्त शेवटचे प्रकट भाषण(पुणे).
१९६२ एप्रिल १५ मुंबईचे राज्यपाल श्रीप्रकाश घरी येऊन भेटले.
१९६३ मे २९ मांडीचे हाड मोडल्याने रूग्णालयात.( मुंबई)
१९६३ नोव्हें ८ पत्नी सौ. यमुनाबाई यांचे निधन.
१९६४ आगस्ट १ मृत्युपत्र केले.
१९६४ आक्टो. भारत सरकारकडून मासिक रू.३०० मानधन देऊन सन्मान.
१९६५ सप्टें गंभीर आजार.
१९६६ फेब्रु १ अन्न नि औषध वर्ज्य करून प्रायोपवेशनास प्रारंभ.
१९६६ फेब्रु २६ शनिवारी सकाळी १०-३० वाजता देह-विसर्जन. वय८३
१९६६ फेब्रु २७ महायात्रेत मुंबई सेंट्रल स्थानकासमोर रा.स्व. संघाची सैनिकी मानवंदना, मुंबईच्या चंदनवाडी विद्युत्-दाहिनीत अग्निसंस्कार...

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकर हे गावातील प्रतिष्ठित गृहस्थ होते. विनायकराव हे त्यांचे दुसरे चिरंजीव. थोरले बाबाराव आणि धाकटे नारायणराव. सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्‍नी येसूवहिनी ह्यांनी त्यांच्यावर आईसारखीच माया केली. सावरकरांचे वडील १८९९ च्या प्लेगास बळी गेले.

सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. चापेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली.

मार्च १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर १९०२ साली फर्गुसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.

राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना त्यांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले. इटालीयन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मेझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते.

श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी घोषित केलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती.

१८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 'अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते स्वातंत्र्यानंतर प्रसिद्ध झाले.

राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराप सावरकर यांना ब्रिटीश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्यापाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रानी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती.

वीर सावरकरांनीच पुढे दुसर्‍या महायुद्धाच्यावेळी जपान येथे जाउन नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी "आझाद हिंद फ़ौजेचे" सेनापतिपद भूषवावे अशी गळ घातली. त्यासाठी त्यांनी श्री रासबिहारी बोस यांचे पत्र नेताजींना दाखवुन सेनापतीची गरज पटवून दिली.पुढचा रोमहर्षक इतिहास सगळ्यांना माहीतच असेल.पण मुख्य प्रेरणा वीर सावरकरांचीच होती.

गोदावरी नदी:


गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमुंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास आंध्रप्रदेशात मिळते.
समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी असे म्हणतात.गोदावरीस महाराष्ट्र व आंध्र प्रदेश राज्यांची जीवनवाहिनी समजतात.
उगम त्र्यंबकेश्वर १,६२० मी.
लांबी    १,४६५ कि.मी.
उपनद्या    इंद्रावती, मंजिरा, बिंदुसरा
धरण    गंगापूर(नाशिक), नांदूर मधमेश्वर(नाशिक), डौलेश्वरम

जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील एक प्रमुख धरण आहे. विदर्भातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आह

Maharashtra Public Service Commission - Current Affairs - Rajiv Gandhi Khel Ratna Awardees (1991-2010)

 Title of Article : Rajiv Gandhi Khel Ratna Awardees (1991-2010)
 Article Link : http://www.Allexampapers.com/cms/mpsc/mpsc_2348.htm

पुरस्कार -पुरस्कारविजेते

 ज्ञानपीठ पुरस्कार:-
देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा म्हणून ज्ञानपीठ पुरस्कार ओळखला जातो.ज्ञानपीठ पुरस्कारात 'पुरस्कार-पत्र', 'वाक्देवीची प्रतीमा' आणि 'पाच लाख रुपयांचा धनादेश' ईत्यादिंचा समावेश असत
ज्ञानपीठ पुरस्कार भारतीय शासनातर्फे साहित्याच्या क्षेत्रात दिल्या जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ.स. १९६१ साली या पुरस्काराची अधिकृत घोषणा झाली आणि इ.स. १९६५ साली प्रसिद्ध मल्याळम लेखक जी. शंकर कुरूप हे या पुरस्काराचे प्रथम मानकरी ठरले. आजपर्यंत सर्वाधिक वेळा पुरस्कार मिळाविण्याचा मान सात वेळा कन्नड आणि सहा वेळा हिंदी साहित्यिकांना मिळाला आहे. मराठी साहित्यिकांना तीन वेळा ह्या बहुमानाचा लाभ झाला असून विष्णू वामन शिरवाडकर, गोविंद विनायक करंदीकर आणि विष्णु सखाराम खांडेकर हे पुरस्कारविजेते मराठी साहित्यिक होय.
इ.स. २०००  इंदिरा गोस्वामी - आसामी
इ.स. २००१  राजेंद्र केशवलाल शाह - गुजराती
इ.स. २००२  दंडपाणी जयकांतन - तमिळ
इ.स. २००३  विंदा करंदीकर- अष्टदर्शने  मराठी
इ.स. २००६ रवींद्र केळेकर - कोकण

जनस्थान पुरस्कार:-
जनस्थान पुरस्कार हा मराठी साहित्यातील सर्वोच्च पुरस्कारांमध्ये गणला जातो.कविश्रेष्ठ श्री वि.वा. शिरवाडकरांनी साहित्यिकांना मराठी साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ह्या पुरस्काराने सन्मानीत करण्यास सुरूवात केली.

आता हा पुरस्कार नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे दर दोन वर्षांनी कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी प्रदान केला जात.
पुरस्कार प्राप्त साहित्यीक:
२००९: ना.धों. महानोर
२००७: बाबूराव बागूल
२००५: नारायण सुर्वे
२००३: मंगेश पाडगावकर
२००१: श्री.ना. पेंडसे
१९९९: व्यंकटेश माडगूळकर
१९९७: गंगाधर गाडगीळ
१९९५: इंदिरा संत
१९९३: विंदा करंदीकर
१९९१: विजय तेंडुलकर

तन्वीर सन्मान:-
डॉ. श्रीराम लागू आणि दीपा लागू यांच्या दिवंगत मुलाच्या नावाने "तन्वीर सन्मान' हा पुरस्कार दिला जातो. ९ डिसेंबर इ.स. २००८ मध्ये पं. सत्यदेव दुबे यांना दिला गेला.

या शिवाय पुरस्काराच्या 'तन्वीर रंगधर्मी' हा पुरस्कारही दिला जातो. ९ डिसेंबर इ.स. २००८मध्ये हा पुरस्कार अभिनेता गजानन परांजपे यांना दिला गेला

साहित्य अकादमी पुरस्कार:-
साहित्य अकादमी पुरस्कार साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणार्‍यांना विविध भाषांतील साहित्यिकांना दिला जातो. साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होते. पन्नास हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

इ.स.२००८ साल चा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीतील लेखक व कादंबरीकार श्याम मनोहर यांना मिळाला आहे. हा पुरस्कार त्यांना "उत्सुकतेने मी झोपलो' या कादंबरी साठी मिळाला.साहित्य अकादमी पुरस्कार साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणार्‍यांना विविध भाषांतील साहित्यिकांना दिला जातो. साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होते. पन्नास हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

 खालील २४ भारतीय भाषांमधील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.


आसामी, बंगाली, बोडो, डोग्री, इंग्लीश, गुजराथी, हिंदी, कन्नड, कश्मिरी, कोंकणी, मैथीली, मलयालम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी, राजस्थानी, संस्कृत, संथाली, सिंधी, तामिळ, तेलगू, व उर्दू
मराठीतील पुरस्कार विजेते:-
२००० – ना.धों. महानोर – 'पानझड'
२००१ – राजन गवस – 'टणकट'
२००२ – महेश एलकुंचवार – 'युगांत'
२००३ – त्र्यंबक विनायक सरदेशमुख – 'डांगोरा एका नगरीचा'
२००४ - सदानंद देशमुख - 'बारोमास'
२००५ - अरूण कोलटकर - भिजकी वही
२००६ - आशा बगे - भूमी
२००७ - जि. एम. पवार - विठ्ठल रामजी शिंदे: जिवन व कार्य
२००८ - श्याम मनोहर - 'उत्सुकतेने मी झोपलो'
२००९ - वसंत आबाजी डहाके - 'चित्रलिपी' काव्यसंग्रह.
पद्मविभूषण पुरस्कार:-
द्मविभूषण हा भारतातील दुसर्‍या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे. यामध्ये एक पदक आणि प्रशस्तीपत्र भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जाते.

जानेवारी २, १९५४ मध्ये याची स्थापना करण्यात आली. याचे महत्त्व भारतरत्न पेक्षा कमी आणि पद्मभूषण पेक्षा जास्त असे समजले जाते. कोणत्याही क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करणार्‍या लोकांना हा पुरस्कार दिला जातो. जुलै १३, १९७७ ते जानेवारी २६, १९८० पर्यंत हा पुरस्कार स्थगीत करण्यात आला होता.

सुरुवातीच्या काळात १.३७५ इंच व्यासाचे गोलाकार सुवर्णपदक पद्मविभूषण पुरस्कारासाठी तयार करण्यात आले होते. त्यावर मधोमध उठावाचे नक्षीकाम केलेले कमळ, पद्मविभूषण अशी अक्षरे आणि खालच्या बाजूला कमळाच्या फुलांचे चक्र होते. दुसर्‍या बाजूस सरकारी राजमुद्रा, देश सेवा अशी कोरलेली अक्षरे आणि कमळाच्या फुलांचे चक्र होते. पण अशा पदकाची फक्त नोंद सापडते ती कुणाला प्रदान करण्यात आल्याचा कुठेही उल्लेख सापडत नाही.

लगेचच दुसर्‍या वर्षी, म्हणजे १९५५ साली या पदकाचं स्वरुप बदलण्यात आलं. सोन्याऐवजी कांस्य धातूच्या १.१८७५ इंच व्यासाचे साधारण गोलाकार पदक तयार करण्यात आले. पदकाच्या एका बाजूला उठावदार कमळ कोरण्यात आले. त्याच्या समोरच्या चार पाकळ्या पांढर्‍या सोन्याने (सोने आणि निकेल किंवा सोने आणि पॅलाडियम धातूंपासून बनविलेला मिश्र धातू) मढविल्या गेल्या. वरच्या आणि खालच्या बाजूस चांदीचा मुलामा असलेली अनुक्रमे पद्म आणि विभूषण अशी अक्षरे कोरली केली. १९५५ पासून १९५७ पर्यंत ही अशी पदके वितरित करण्यात आली. त्यानंतर १९५८ सालापासून आजपर्यंत याच्या स्वरुपामध्ये ब्रॉन्झच्या धातूतील थोडा केलेला बदल वगळता कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या पदकाच्या वरच्या बाजूला फिक्या गुलाबी रंगाची रिबन लावलेली असते.

सन २०१० पर्यंत एकूण २६४ थोर व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अभिमान वाटावा अशी बाब म्हणजे दिल्लीच्या खालोखाल महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या किंवा महाराष्ट्र भूमी ही कार्यक्षेत्र असलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

महाराष्ट्रातील पद्मविभूषणप्राप्त महान विभूतींची संख्या ४९ आहे, तर ५० दिल्लीवासियांनी हा पुरस्कार प्राप्त केलेला आहे
पुरस्कार विजेते:- 

२००९ चंद्रिकाप्रसाद श्रीवास्तव    नागरी सेवा      महाराष्ट्र भारत
२००९ सुंदरलाल बहुगुणा     पर्यावरण संरक्षण     उत्तराखंड भारत
२००९ डी.पी. चट्टोपाध्याय      साहित्य व शिक्षण    पश्चिम बंगाल भारत
२००९ जसबीरसिंग बजाज      वैद्यकशास्त्र    पंजाब भारत
२००९ पुरुषोत्तम लाल     वैद्यकशास्त्र     उत्तर प्रदेश भारत
२००९ गोविंद नारायण    सार्वजनिक कार्य     उत्तर प्रदेश भारत
२००९ अनिल काकोडकर    विज्ञान व तंत्रज्ञान    महाराष्ट्र भारत
२००९ जी.माधवन नायर    विज्ञान व तंत्रज्ञान    कर्नाटक भारत
२००९ सिस्टर निर्मला   सामाजिक कार्य    पश्चिम बंगाल भारत
२००९ ए.एस. गांगुली  व्यापार व उद्योग   महाराष्ट्र भारत

Maharashtra Public Service Commission - Exam Papers - MPSC - Assistant Sale Tax Inspector Preliminary Exam Papers - 2009

 Title of Article : MPSC - Assistant Sale Tax Inspector Preliminary Exam Papers - 2009
 Article Link : http://www.Allexampapers.com/cms/mpsc/mpsc_2347.htm

Sunday, January 23, 2011

Dear All This data is collected for our reference from various resources not for any commercial use .we are not responsible if any information is wrong..........Please Subscribe and Share your Information with all.