मुख्यालय : अहमदनगर
क्षेत्रफळ : १७,०४८ चौ.कि.मी.
लोकसंख्या : ४०,८८,०७७
जनगणना : २००१ नुसार
तालुके - संगमनेर,अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे, पाथर्डी,
शेवगाव, अहमदनगर, राहुरी, पारनेर, कर्जत, श्रीगोंदे, जामखेड, राहता.
सीमा उत्तरेस - नाशिक व औरंगाबाद जिल्हा, पूर्वेस- बीड व
उस्मानाबाद जिल्हा, दक्षिणेस- सोलापूर व पुणे जिल्हा, पश्चिमेस- ठाणे व
पुणे जिल्हा.
नद्या - गोदावरी, सीना, मुळा, प्रवरा, भीमा, ढोर, घोड.
प्रमुख शेती - उत्पादन तांदूळ, ज्वारी, गहू, कापूस, ऊस, मका,
मोसंबी, द्राक्षे
धरणे - प्रवरा नदीवर विल्सन बंधारा भंडारदरा, मुळा नदीवर बारागाव
नांदूर येथील धरण
थंड हवेचे ठिकाण - भंडारदरा
अधिक माहिती : -
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे.
पंडित नेहरूंनी येथील किल्ल्यात बंदिवासात असतानी 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया'
हा प्रसिध्द ग्रंथ लिहिला.
येथील चांदबीबीचा महाल प्रसिद्ध आहे.
पद्मश्री विठठलराव विखे पाटील यांनी देशातील पहिला सहकारी साखर कारखाना
प्रवरा नगर येथे काढला.
'कळसुबाई' हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वतशिखर अहमदनगर व नाशिक या
जिल्ह्यांच्या सीमेवर आहे.
हा महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा आहे.
राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे.
पुणतांबे येथे संत चांगदेव महाराजांची समाधी आहे.
या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक साखर कारखाने आहेत.
श्रीरामपूर येथे मोसंबी संशोधन केंद्रा आहे.
No comments:
Post a Comment