Get All MPSC News on your Email

Email     

Exam Paper Search

Tuesday, April 16, 2013

महाराष्ट्र राज्य - भूगोल

महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वांत विकसित राज्य आहे. भारताच्या पश्चिम-मध्य भागात असलेल्या महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. मुंबई, देशातील सर्वांत मोठे शहर, हे महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर आहे. तर नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र भारताचे अग्रणी राज्य आहे.

                        Maharashtra
 महाराष्ट्र राज्याची निर्मिती- 1 मे 1960
भौगोलिक स्थान साधारणत: भारताच्या मध्यवर्ती भागात
अक्षांश : 15° 44' ते  22° 6' उत्तर अक्षवृत्त
रेखांश :

72° 36' ते 80° 54' पूर्व रेखावृत्त

क्षेत्रफळ

3 लाख 7 हजार 713 चौ.कि.मी. (3,07,713)

दक्षिण - उत्तर  लांबी

720 कि.मी.

पुर्व -  पश्चिम  लांबी

800 कि.मी.

 



महाराष्ट्र राज्याची निर्मिती


ऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना करण्याचे हाती घेतले गेले. साधारणतः भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली.
अखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत.




भूगोल


महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागात वसलेले राज्य आहे. हे उत्तर प्रदेश खालोखाल सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य असून क्षेत्रफळानुसार देशातले तिसरे मोठे राज्य आहे. देशाच्या औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचा २५ % वाटा आहे तसेच २०१०-११ या वर्षात सकल देशांतर्गत उत्पन्नात महाराष्ट्राचा २३.२ % वाटा आहे.

308,000 किमी2 (119,000mi2) क्षेत्रावर महाराष्ट्राचा विस्तार असून क्षेत्रफळानुसार महाराष्ट्...र हे भारतातले तिस-या क्रमांकाचे राज्य आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश, पूर्वेला छत्तीसगढ, आग्नेय दिशेला आंध्र प्रदेश, दक्षिणेला कर्नाटक, तर नैऋत्य दिशेला गोवा राज्य आहे. महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात राज्य असून दादरा आणि नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश या दोघांच्या दरम्यान आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किना-याला अरबी सुमद्राचे सान्निध्य लाभले आहे.

समुद्रकिना-याला समांतर असणारा पश्चिमी घाट, सह्याद्री म्हणून प्रसिध्द आहे. या सह्यकड्यांमध्ये नाशिक शहराजवळ असणारे कळसुबाई हे 1200 मी. (4000 फूट) उंचीचे महाराष्ट्रातले अत्युच्च शिखर आहे. या सह्यकड्यांच्या पश्चिमेला 50 ते 80 किलोमीटर रूंदीचा कोकण किनारा आहे. या पश्चिम घाटामधून अनेक नद्या उगम पावतात. त्यापैकी गोदावरी आणि कृष्णा या दक्षिण भारतातील प्रमुख नद्या बंगालच्या खाडीपर्यंत प्रवास करतात. या नद्यांनी देशातले एक मोठे खोरे तयार केले आहे.
महाराष्ट्रात 35 जिल्हे असून प्रशासकीय हेतूने त्यांची विभागणी सहा महसूली विभागांत (कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर) आणि आठ शैक्षणिक विभागांत (मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, कोल्हापूर, आणि लातूर) करण्यात आली आहे. या 35 जिल्ह्यांची विभागणी 109 उपविभाग आणि 355 तालुक्यांमध्ये करण्यात आली आहे. राज्यात स्थानिक अथवा जिल्हा स्तरावर नियोजनाच्या सक्षम यंत्रणांची दीर्घ परंपरा आहे. ग्रामीण भागात स्वयं-प्रशासनासाठी 33 जिल्हा परिषदा, 355 पंचायत समित्या आणि 27,993 ग्राम पंचायती कार्यरत आहेत. शहरी भागात 23 महानगर पालिका, 222 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायती कार्यरत आहेत.
भू शास्त्रीय रूपरेखा


हवामान


महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण मान्सूनसह उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन ऋतू अनुभवता येतात. उन्हाळा - (मार्च ते मे), पावसाळा - (मान्सून), (जून ते सप्टेंबर), मान्सूनोत्तर (ऑक्टोबर ते नोव्हेंबर), हिवाळा (जानेवारी ते मार्च)



नैसर्गिक साधनसंपत्ती


मॅगेनीज, कोळसा, लोह, चुनखडी, तांबे, बॉक्साईट, सिलिका, वाळू आणि मीठ अशी अनेक खनिजे महाराष्ट्रात सापडतात. यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर हे जिल्हे कोळशाच्या खाणींनी समृध्द आहेत. 1970 साली बॉम्बे हाय या तेल क्षेत्राजवळ समुद्राखाली तेलाच्या साठ्याचा शोध लागला.


नैसर्गिक साधनसंपत्ती


मॅगेनीज, कोळसा, लोह, चुनखडी, तांबे, बॉक्साईट, सिलिका, वाळू आणि मीठ अशी अनेक खनिजे महाराष्ट्रात सापडतात. यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर हे जिल्हे कोळशाच्या खाणींनी समृध्द आहेत. 1970 साली बॉम्बे हाय या तेल क्षेत्राजवळ समुद्राखाली तेलाच्या साठ्याचा शोध लागला.





 

 महाराष्ट्र राज्य - भौगोलिक स्थान


महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेला स्थित आहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे. या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे.

दख्खनचे पठार, कोकणचा समुद्रकिनारा आणि घाट अशा विभिन्न भौगोलिक स्थिती महाराष्ट्रात आढळतात. घाट म्हणजे उंचावरील टेकड्यांचा विस्तार असून ते चिंचोळ्या रस्त्यांनी विभागले गेले आहेत. सह्याद्रीच्या रांगा समुद्रसपाटीपासून 1000 मी. उंचीवर असून, तिथल्या पठारांसाठी प्रसिध्द आहे. कोकण हा समुद्रकिनारी भागात वसलेला अरूंद भूभाग आहे. त्याची रूंदी 50 किमी असून, हा भाग समुद्रसपाटीखाली 200 मी वर वसलेला आहे. उत्तरेकडे सीमेवरील सातपुडा पर्वतरांगा हा आणखी एक महत्वाचा भूभाग. या भागात पूर्व सीमेवरील भामरागड-चिरोली-गायखुरी रांगांनी एक अभेद्य तटबंदीच उभी केली आहे. या रांगाही राज्यासाठी नैसर्गिक संरक्षक ठरल्या आहेत

प्राकृतिक सीमा

पूर्व - चिरोली टेकडया व भामरागड डोंगर
पश्चिम - अरबी समुद्र 
दक्षिण - तेरेखोल खाडी, हिरण्यकेशी नदी 
उत्तर - सातपुडा पर्वत
वायव्य - सातमाळा डोंगररांग (अक्राणी टेकड्या)
ईशान्य - दरकेसा टेकड्या

राजकिय सीमा (शेजारील राज्ये)
उत्तर - पूर्व - क्षत्तीसगड, मध्यप्रदेश
दक्षिण - कर्नाटक, गोवा
वायव्य - गुजरात, दादरा व नगर हवेली


मुख्य नद्या

गोदावरी, कृष्णा आणि तापी या राज्यातल्या महत्वाच्या अशा तीन नद्या आहेत.


वनस्पती सृष्टी


राज्यातील वने ही प्रामुख्याने सदाहरित, पानझडी प्रकारातील आहेत. यापैकी बहुतेक वने पूर्व आणि सह्याद्रीच्या परिसरात आहेत.

महाराष्ट्रात पाच राष्ट्रीय उद्याने, तीन अभयवने आणि वन्यजीव/ पक्ष्यांसाठी 24 अभयारण्ये आहेत. वाघ, चित्ते, गवे, हरीणे, काळवीटे, रानडुक्करे, अस्वले तसेच नीलगायी आढळून येतात..

स्रोत – भारत सरकार, महाराष्ट्राचे आर्थिक सर्वेक्षण 2010-11

देशातील रस्त्यांचे सर्वात विस्तृत जाळे महाराष्ट्रात (एकूण भारतीय रस्ते जाळ्यापैकी 7%) असून या भागातील 97.5% गावे परस्परांशी चांगल्या रस्त्यांनी तर 2% उत्तम रस्त्यांनी जोडली गेली आहेत. राज्यात मध्य आणि देशातील रेल्वे विभागाची 2 मुख्यालये आहेत. देशातील एकूण रेल्वे जाळ्यापैकी महाराष्ट्रात 9.2% रेल्वे जाळे पसरलेले आहे. अमेरीका, युरोप, आशिया तसेच भारतातील प्रमुख शहरांशी, राज्य हवाई मार्गानेही जोडलेले आहे. देशात सर्वाधिक विमानतळांची संख्याही (6%) महाराष्ट्रात आहे.




 

विभाग

  • महाराष्ट्र राज्य ३५ जिल्ह्यांत विभागले गेले आहे.
  • या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा महसुली विभाग आहेत-
  1.              पुणे
  2.              नाशिक
  3.              औरंगाबाद
  4.              कोकण
  5.               नागपूर
  6.               अमरावती 

 

हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत.
भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत:

  1. देश किंवा पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग)
  2. उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग)
  3. मराठवाडा (औरंगाबाद विभाग)
  4. विदर्भ किंवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग) 
  5. आणि कोकण (कोकण विभाग).

                     

  प्राकृतिक विभाग - 5
 1  विदर्भ 11 जिल्हे
2मराठवाडा 8 जिल्हे
3 पश्चिम महाराष्ट्र6 जिल्हे
4कोकण 6 जिल्हे
5 खानदेश4 जिल्हे

 

प्रशासकिय विभाग -7
 1 औरंगाबाद  4 जिल्हे
2 नागपूर6 जिल्हे
 3मुंबई 6 जिल्हे
 4 नाशिक

5 जिल्हे

 5अमरावती

5 जिल्हे

 6 पुणे

5 जिल्हे


 

 पुणे विभाग

 

  पुणे विभाग
 क्षेत्रफळ -  ५८,२६८ किमी
लोकसंख्या (२००१ची गणना) ९९,७३,७६१
जिल्हे कोल्हापूर जिल्हा, पुणे जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा
साक्षरता ७६.९५%
ओलिताखालील जमीन ८,८९६ किमी
मुख्य पिकेज्वारी, गहू, बाजरी, ऊस, तांदूळ, सोयबीन, कांदा, भुईमुग, द्राक्ष


No comments:

Post a Comment

Dear All This data is collected for our reference from various resources not for any commercial use .we are not responsible if any information is wrong..........Please Subscribe and Share your Information with all.