1.' विकिपीडिया ' कोणत्या होवू घातलेल्या कायद्याचा निषेध करण्यासाठी 24
तासांकरिता वेबसाईट बंद ठेवणार आहे ?
A. SOPA
B. PIPA
C. वरील दोन्ही
D. वरीलपैकी एकही नाही
Ans. C. वरील दोन्ही
SOPA (Stop Online Piracy Act) आणि PIPA (PROTECT IP Act: Preventing
Real Online Threats to Economic Creativity and Theft of Intellectual
Property Act of 2011) हे अमेरिकन संसदगृहात मांडलेले आहेत. ह्या
विधेयकांवर ह्या महिन्यात चर्चा अपेक्षित आहे. परंतु याहू,गुगल,फेसबुक सह
बहुतांश लहान मोठया कंपन्या आणि अनेक गैर-सरकारी संस्था ह्या बिलाला
विरोध करत आहेत. ह्या विधेयकांमुळे वेब (web) सेन्सॉर होईल आणि
व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होईल असा विरोधकांचा आक्षेप आहे.
2. पहिल्या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले ?
A. गौतम राजाध्यक्ष
B. डॉ.विजया राजाध्यक्ष
C. डॉ.रा.चिं.ढेरे
D. आनंद यादव
Ans. B. डॉ.विजया राजाध्यक्ष
3. 2011 च्या 'आशियाई बिलियार्ड' चे विजेतेपद कोणी प्राप्त केले?
A. गीत सेठी
B. पंकज अडवाणी
C. अलोक कुमार
D. मायकल फरेरा
Ans. C. अलोक कुमार
4. कोणत्या ग्रहावरील दर्यामध्ये पाणी वाहत असल्याचे पुरावे मिळाल्याचा
दावा अमेरिकेच्या 'नासा'ने अलीकडेच केला आहे ?
A. शुक्र
B. मंगळ
C. गुरु
D. शनी
Ans. B. मंगळ
5. युध्दांमधील चांगल्या कामगिरी सोबत' उडत्या शवपेट्या ' म्हणून
कुख्यातही ठरलेले 'मिग-21' ही विमाने भारतीय वायुसेना कोणत्या
वर्षापर्यंत सेवेतून पूर्णपणे बाद करणार आहे ?
A. सन 2014
B. सन 2015
C. सन 2016
D. सन 2017
Ans. D. सन 2017
6. कर्नाटकाचे 'लोकायुक्त' कोण आहेत ?
A. न्यायमूर्ती संतोष हेडगे
B. न्यायमूर्ती शिवराज व्ही.पाटील
C. जगदीश शहर
D. सदानंद गौडा
Ans. B. न्यायमूर्ती शिवराज व्ही.पाटील
7. 'कौन बनेगा करोडपती' ह्या सोनी टीव्ही वरील रियालिटी शो मध्ये पाच
कोटी रुपयांचे बक्षीस कोणी जिंकले ?
A. विजयकुमार
B. सुरेंदरकुमार
C. सुशीलकुमार
D. यापैकी नाही
Ans. C. सुशीलकुमार
8. अतिप्रचंड खजिन्यामुळे चर्चेत असलेले 'पद्मनाभ स्वामी मंदिर' कोणत्या
राज्यात आहे ?
A. तामिळनाडू
B. केरळ
C. मध्यप्रदेश
D. आंध्रप्रदेश
Ans. B. केरळ
9. 'युएन वुमेन 'ही संस्था कोणत्या दिवसापासून अस्तित्वात आली ?
A. 1 जानेवारी 2011
B. 8 मार्च 2011
C. 1 जानेवारी 2010
D. 1 एप्रिल 2010
Ans. A. 1 जानेवारी 2011
10. 2011 चे रेमन मॅगसेसे पारितोषिक विजेते हरीश हांडे यांनी कोणत्या
कंपनीद्वारे गरीबांना अतिशय कमी खर्चात व परवडणार्या दरात सौरऊर्जेचे
तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले ?
A. नाल्को
B. सेल्को
C. सेल
D. ग्रीन एनर्जी
Ans. B. सेल्को (Solar Electric Light Company)
No comments:
Post a Comment