शिष्यवत्ती परीक्षा - मार्च 2011
मराठी माध्यम
विषय :गणित व सामाजिकशास्त्र
गुण : १००
वेळ : १ तास
गणित
१. सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या व सर्वात मोठी सममूल संख्या
यांचा गुणाकार किती?
अ) २२ ब)१०८७ क) १९४ ड) ३०
२. एका आयताकृती जागेची लांबी रुंदीच्या अडीचपट आहे. त्या आयताच्या सर्व
बाजूची बेरीज ३५ मी. असल्यास त्या जागेवर अंथरण्यासाठी किती चौ.मी.
क्षेत्रफळाची सतरंजी लागेल?
अ) २५० ब) २९४ क) ६२.५ ड) ६.२५
३. a, , b, c या तीन संख्यांचा मसावी ६ आहे,तर ६a , ४b व २c या संख्यांचा
मसावी किती येईल?
अ) ७२ ब) २४ क) १२ ड) ३६
४. दोन समांतर रेषांनी दोन समांतर रेषांना छेदल्यास एकरूप कोणाच्या किती
जोड्या तयार होतील?
अ) ५६ ब) २८ क) ८ ड) १२८
५. खालील पैकी कोणत्या माहितीवरून प्रतल निश्चितहोत नाही?
अ) एक रेषीय तीन बिंदू ब) परस्परांना छेदनार्या दोन रेषा
क) एका बिंदुतून जाणारे दोन नेकरेषीय किरण ड) तीन नेकरेषीय बिंदू
६. ३.५ मी. लांब २.५ मी. रुंद व २ मी. उंच पत्र्याची बंदिस्त टाकी तयार
करण्यासाटी १२० रु. प्रती चो.मी. दराने एकून किती रुपये होईल?
अ) २१०० रु. ब) २४९० रु. क) ४९८० रु. ड) १४४० रु.
७. आज रामच्या वयापेक्षा राजा १० वर्षांनी मोठा, तर रहीम २ वर्षांनी लहान
आहे, रहीम व राजाचे वयाचे गुणोत्तर ५:७ आहे, तर अजून १० वर्षांनी
तिघांच्या वयाची बेरीज किती येईल?
अ) १०४ वर्षे ब) १४२ वर्षे क) १३४ वर्षे ड) ११४ वर्षे
८. ३: ४: ५ या प्रमाणात असणाऱ्या मोठ्यात मोठया दोन अंकी संख्यांची सरासरी किती?
अ) ७४ ब) ७६ क) ८० ड) ६८
९. ६ सायकलींची किमत १,२५००० रु. आहे, तर अशा ९ सायकलींची किंमत किती?
अ) १,६७५०० रु. ब) १,८५७०० रु. क) १,८७५०० रु. ड) निश्चित सांगता येत नाही
१०. आदर्श माध्यमिक विद्यालयाची मंगळवारची विद्यार्थी उपस्थिती ९२,५%
होती. अनुपस्थित विद्यार्थ्याची संख्या ४५ असेल,तर उपस्थित
विद्यार्थ्यांची संख्या किती?
अ) ८६० ब) ५५५ क) ६०० ड) ९७०
११. ४८ मी. व ८० मी. लांब मापाचे दोन दोरखंड आहेत. त्यांचे जास्तीत जास्त
लांबीचे परंतु समान मापाचे तुकडे करायचे आहेत, तर प्रत्येक तुकड्याची
लांबी किती ठेवावी?
अ) ४ मी. ब) ८ मी. क) १६ मी. ड) ३२ मी.
१२. प्रत्येक तासाला दहा मिनिटे विश्रांती घेऊन ताशी ८ किमी. वेगाने
चालणारा स्पर्धक सकाळी ७.३० वाजता निघाल्यास ५६ किमी. अंतरावरील ठिकाणी
किती वाजता पोहचेल?
अ) २.३० वा. ब) ३.३० वा. क) २.४० वा. ड) ३.४० वा.
१३. १५ रुपयांच्या तिकिटांची संख्या २० रुपयांच्या तिकिटाच्या संखेपेक्षा
२ ने कमी आहे. एकूण ६७० रुपयांची तिकिटे घेतल्यास १५ रुपयांची तिकिटे
किती?
अ) २० ब) १५ क) २७ ड) १८
१४. एका त्रिकोणाच्या दुसर्या बाजूच्या निमपट पहिली बाजू, पहिल्या
बाजूच्या चोपट तिसरी बाजू आहे. त्या त्रिकोणाची परिमिती १६.१ सेमी.
असल्यास त्या त्रिकोणाची दुसरी बाजू किती?
अ) ४.६ सेमी. ब) २.३ सेमी. क) ६.९ सेमी. ड) ९.२ सेमी.
१५. ८ मी. लांब, ३ मी. रुंद व १.२५ मी.उंच असणाऱ्या ट्रकमधील वाळू ५ मी.
लांबी व १.५ मी. खोली असणाऱ्या होदामध्ये ओतल्यास ४ होद पूर्ण भारतात, तर
प्रत्येक होदांची रुंदी किती?
अ) १००० सेमी. ब) ४ मी.. क) १०० सेमी. ड) ५०० सेमी.
१६. विक्रीची किंमत तोट्याच्या दुप्पट असल्यास तोट्याचे शेकडा प्रमाण किती?
अ) ५० ब) २५ क)४० ड) ३३ १/२
१७. रमेश व सुरेश प्रत्येकी १२,००० रु. एकाच व्याजदराने कर्ज घेतले.
रमेशने १ वर्षे ९ महिन्यात व सुरेशने अडीच वर्षांनी कर्ज फेडले. दोघांनी
मिळून बँकेमध्ये मुद्दल व व्याजासह २६,५५० रु. भरले ,तर व्याजाचा दर
किती?
अ) ५% ब) १२.५% क) ८% ड) ७.५%
विभाग II
सामाजिकशास्त्रे ( इतिहास,नागरिकशास्त्र व भूगोल)
१८. इराकमधील-----------येथे विशाल राजवाडे हे उत्कृष्ट स्थापत्यकलेचे उदाहरण आहे.
अ) केरो ब) मदिना क) कोडॉरबा ड) बगदाद
१९. कवी कंबन याने कोणत्या भाषेत रामायण लिहिले?
अ) तेलगु ब) तमिळ क) कन्नड ड) संस्कृत
२०. आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ ----------ने आग्रा येथे 'ताजमहाल' हि
वास्तू बांधली.
अ) अकबर ब) शाहजहान क) हुमायून ड) बाबर
२१. खाली दिलेल्या जोडीमधील चुकीची जोडी ओळखा:
अ) मलिक मुहम्मद जायसी -- पद्मावत
ब) बाबर -- तुझुक-ई-बाबरी
क) अबुल फजल -- एन - ई- अकबरी
ड) गुलबदन बेगम -- अकबरनामा
२२. प्रगण्याचे मुख्य ठिकाण कोणते?
अ) कसबा ब) मोजा क) पंढरपूर ड) गाणगापूर
२३. विशालगडावर सुखरूप पोहचल्यानंतर शिवरायांनी कोणाबरोबर तह केला?
अ) सिद्दी जोहर ब) निजामशहा क) मिर्झा राजे जयसिंग ड) आदिलशहा
२४.भारतीय संविधानाने नारीकांना खालीलपैकी कोणते स्वातंत्र्य देलेले नाही?
अ) संघटना ब) शोषण क) संचार ड) वास्तव्य
२५. महाराष्ट्र विधिमंडळचे 'हिवाळी' अधिवेशन कोठे होते?
अ) नागपूर ब) औरंगाबाद क) मुंबई ड) नाशिक
२६. उच्य न्यायालायच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करते?
अ) उपराष्ट्रपती ब) पंतप्रधान क) राष्ट्रपती ड) राज्यपाल
२७. सूर्य-पृथ्वी-चंद्र एका सरळ रेषेत आले, तर खालील पेकी कोणत्या
दिवशी चंद्र ग्रहण होईल ?
अ) अमावास्या ब) पोर्णिमा क) चतुर्थी ड) अष्टमी
२८. दोन मोठया जालाशायांना जोडणाऱ्या पाण्याच्या चिंचोळ्या भागास काय मनतात?
अ) सरोवर ब) आखत क) सामुद्रधुनी ड) खाडी
२९. कोणत्या खंडात ल्यानोज , कंपोज , पंपास हे तीन गवताळ प्रदेश आढळतात?
अ) दक्षिण अमेरिका ब) आफ्रिका क) आशिया ड) ओस्ट्रेलिया
३०. चुकीची जोडी ओळखा:
अ) अलास्का-- पांढरी अस्वले
ब) जॉर्जेस बँक -- मासेमारी
क) येलोस्टोन -- राष्ट्रिय उद्यान
ड) संफ्रन्सिस्को -- जागतिक बँकेची मुख्य कचेरी
No comments:
Post a Comment