Get All MPSC News on your Email

Email     

Exam Paper Search

Wednesday, April 7, 2010

Current Affairs:History

 
स्पर्धा परीक्षा :-

ऐतिहासिक घटना

*    १४९८, २० मे- वास्को-द-गामा या पोर्तुगीज खलाशाने  केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताकडे येण्याचा जलमार्ग शोधून काढला. सर्वप्रथम वास्को-द-गामा भारतात कालीकत येथे उतरला. कालीकतच्या झामोरीन राजाने त्याचे स्वागत केले.
*    १६००- ईस्ट इंडिया कंपनीची इंग्लंडमध्ये स्थापना.
*    १६१०- मुंबई बेट इंग्रजांना पोर्तुगीजांकडून आंदण मिळाले.
*    १६३०, १९ फेब्रुवारी- छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म.
*    १६६४- फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना.
*    १६७४, १६ जून- छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक.
*    १६८०, १३ एप्रिल- छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू.
*    १७१३- पेशवाईचा उदय.
*    १७५७, २३ जून- प्लासीची लढाई (बंगालचा नवाब सिराजउद्दौलाचा इंग्रजांकडून पराभव)
*    १७५७- रॉबर्ट क्लाईव्हने भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया घातला.
*    १७७३- रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट. कोलकाता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना.
*    १७७४- वॉरन हेस्टिंग्ज भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाला.
*    १७७९- फ्रेंच राज्यक्रांतीस सुरुवात.
*    १७९३- लॉर्ड कॉर्नवालिसने बंगालमध्ये कायमधारा पद्धतीची सुरुवात केली.
*    १८१८- पेशवाईचा अस्त/ मराठी सत्तेचा शेवट.
*    १८२८, २० ऑगस्ट- ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली.
*    १८२९- विल्यम बेंटिकने सतीबंदी प्रथा कायदा संमत.
*    १८४८- भारतात स्वतंत्र तार व पोस्ट खाते सुरू (लॉर्ड डलहौसी)
*    १८५२- नाना शंकरशेठ, दादाभाई नौरोजी व भाऊ दाजी लाड यांनी 'बॉम्बे असोसिएशनची' स्थापना केली.
*    १८५३- मुंबई-ठाणे दरम्यान भारतातील पहिली रेल्वे सुरू.
*    १८५४- मुंबईत पहिली स्वदेशी कापड गिरणी सुरू.
*    १८५६- लोकमान्य बाळ गंघाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्य़ातील चिखली येथे जन्म.
*    १८५७- भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामासाठी प्रसिद्ध काळ, संग्रामाची पहिली सुरुवात 'मीरत' येथे झाली. मंगल पांडे या सैनिकाने काडतुसाचे कारण दाखवून प्रथमत: संग्रामास सुरुवात केली.
*    १८५७- मुंबई, कोलकाता, चेन्नई विद्यापीठांची स्थापना.
*    १८६१- इंडियन कॉन्सिल अ‍ॅक्ट पास. मुंबई, कोलकाता, चेन्नई येथे हायकोर्टाची स्थापना, रवींद्रनाथ टागोरांचा जन्म.
*    १८६२- न्या. रानडे व डॉ. आर. जी. भांडारकर मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर.
*    १८६७- प्रार्थना समाजाची स्थापना (न्या. रानडे, डॉ. भांडारकर व डॉ. आत्माराम पांडुरंग).
*    १८६९, २ ऑक्टोबर- महात्मा गांधी यांचा पोरबंदर येथे जन्म.
*    १८७५, ७ एप्रिल- मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना (स्वामी दयानंद सरस्वती).
*    १८७६, २३ फेब्रुवारी- थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांचा अमरावती जिल्ह्य़ातील शेणगाव येथे जन्म.
*    १८७७- मुंबई शेअर बाजाराची स्थापना.
*    १८७८- व्हर्नाक्युलर प्रेस अ‍ॅक्ट संमत.
*    १८८१- लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे सुरू केली.
*    १८८२- लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा संमत केला.
*    १८८५, २८ डिसेंबर- मुंबई येथे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ए. ओ. ह्य़ुम यांनी केली.
*    १८८९, १४ नोव्हेंबर- पंडित जवाहरलाल नेहरू यांचा अलाहाबाद येथे जन्म.
*    १८९०- महात्मा फुले यांचा जन्म (पुणे).
*    १८९१- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म (महू).
*    १८९३- स्वामी विवेकानंदांनी 'शिकागो' येथील जागतिक धर्म परिषद गाजविली.
*    १८९७- रामकृष्ण मिशनची स्थापना.
*    १९००- स्वा. सावरकरांनी नाशिक येथे 'मित्रमेळा' संघटनेची स्थापना केली.
*    १९०४- पहिला सहकारविषयक कायदा संमत झाला.
*    १९०५, १६ ऑक्टो.- लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली.
*    १९०७- सुरत येथील अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडून जहाल व मवाळ गट वेगळे.
*    १९०८- लोकमान्य टिळकांनी 'मंडालेच्या' तुरुंगात 'गीतारहस्य' ग्रंथ लिहिला.
*    १९११- सम्राट पंचम  जॉर्जची भारतास भेट.
    - बंगालची फाळणी रद्द झाल्याची पंचम जॉर्जची घोषणा.
    - भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला गेली.
*    १९१४- पहिल्या महायुद्धास सुरुवात.

*    १९१५- महात्मा गांधी आफ्रिकेतून परत.
*    १९१७- गांधीजींचा बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह.
*    १९१९, १३ एप्रिल- अमृतसर येथे जालियनवाला बाग हत्याकांड.
*    १९२०, १ ऑगस्ट- लोकमान्य टिळकांचा मृत्यू, मुंबई येथे गिरगाव चौपाटीजवळ दहन (समाधी).
*    १९२४- सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रह केला.
*    १९२७- भारतातील पहिले रेडिओ प्रसारण केंद्र मुंबईत सुरू.
*    १९३०- महात्मा गांधींची 'मिठाचा कायदा तोडण्यासाठी' साबरमती ते दांडी पदयात्रा.
*    १९३२- महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यातील ऐतिहासिक 'पुणे करार.'
*    १९३५- भारत सरकारचा कायदा संमत, या कायद्यानुसार 'ब्रह्मदेश' भारतापासून वेगळा करण्यात आला.
*    १९३६- फैजपूर येथील काँग्रेसचे ५० वे अधिवेशन, अध्यक्ष- पंडित नेहरू.
*    १९३९, १ सप्टेंबर- दुसऱ्या महायुद्धास सुरुवात.
*    १९४२- मुंबई येथे 'गवालिया टँक' येथे भारत छोडो चळवळीस सुरुवात.
*    १९४४- नाना पाटील यांनी प्रतिसरकारची स्थापना केली.
*    १९४५, २४ ऑक्टोबर- संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना.
*    १९४५- वेव्हेल योजना अपयशी ठरली.
*    १९४५, १८ ऑगस्ट- फार्मोसा बेटावर सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघात.
*    १९४६- कॅबिनेट मिशन (त्रिमंत्री परिषद)ची भारतास भेट.
 - २ सप्टेंबर, जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली हंगामी राष्ट्रीय सरकारची स्थापना.
*    १९४७, २० फेब्रुवारी- भारतास स्वातंत्र्य दिले जाईल, अशी लॉर्ड अॅटलींची घोषणा.
 १८ जुलै- ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या विधेयकास इंग्लंडच्या राजाची मान्यता मिळून कायद्यात रूपांतर.
            १५ ऑगस्ट, रोजी ब्रिटिशांची राजवट संपुष्टात येऊन भारताला स्वातंत्र्य मिळाले.
*    १९४७, १६ ऑगस्ट- रॅडक्लीफ समितीनुसार भारत-पाक सीमा अस्तित्वात.
*    १९४८, ३० जानेवारी- महात्मा गांधींचा नथुराम गोडसेकडून खून.
*    १९४९, २६  नोव्हेंबर- भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली.
*    १९५०, २६ जानेवारी- पहिला भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा.

No comments:

Post a Comment

Dear All This data is collected for our reference from various resources not for any commercial use .we are not responsible if any information is wrong..........Please Subscribe and Share your Information with all.