Get All MPSC News on your Email

Email     

Exam Paper Search

Friday, August 20, 2010

२०१० फिफा विश्वचषक

२०१० फिफा विश्वचषक
२०१० फिफा विश्वचषक ही जून ११ ते जुलै ११, इ.स. २०१० दरम्यान खेळली गेलेली जगातील अग्रणीय फुटबॉल स्पर्धा होती. दक्षिण आफ्रिकेत खेळली गेलेली ही स्पर्धा फिफा विश्वचषक स्पर्धेची १९वी आवृत्ती होती. ही स्पर्धा प्रथमच आफ्रिकेत खेळली गेली. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी फिफाच्या २०८ सदस्य राष्ट्रांपैकी २०४ राष्ट्रांनी भाग घेतला. पात्रता फेरी ऑगस्ट २००७ पासून सुरू होती. Flag of स्पेन स्पेनने अंतिम सामन्यात Flag of the Netherlands नेदरलँड्सवर १-०ने मात करुन विजेतेपद मिळवले.
पारितोषिक रक्कम आणि क्लबांचा मोबदला

२०१० फिफा विश्वचषकात एकूण ४२ कोटी अमेरिकन डॉलरची पारितोषिके दिली गेली. २००६च्या स्पर्धेपेक्षा हा आकडा ६०%ने मोठा आहे. स्पर्धेतील प्रत्येक संघाला सामने सुरू होण्याआधीच १० लक्ष अमेरिकन डॉलर देण्यात आले. साखळी सामन्यांनंतर बाहेर पडलेल्या संघांना प्रत्येकी ८० लाख डॉलर मिळाले. इतर संघांची कमाई अशी होती:

    * उप-उपांत्यपूर्व (सोळा संघांची फेरी) - ९० लाख डॉलर
    * उपांत्यपूर्व फेरी - १ कोटी ८० लाख डॉलर
    * उपांत्य फेरी - २ कोटी डॉलर
    * तिसरा क्रमांक - २ कोटी ४० लाख डॉलर
    * विश्वविजेता - ३ कोटी डॉलर
स्पर्धेचा प्रतिनिधी
झाकुमी, २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेचा प्रतिनिधी

झाकुमी हा १५ वर्षे वयाचा मानवसदृश चित्ता २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेचा प्रतिनिधी आहे. याचा जन्मदिनांक जून १६, १९९४ (1994-06-16) (वय १६) हा मानला जातो. झाकुमी नावातील झा हा भाग दक्षिण आफ्रिकेच्या za या आंतरराष्ट्रीय लघुरुप तर कुमी हा भाग अनेक आफ्रिकन भाषांतील दहा अंकाच्या उच्चारातून घेण्यात आला आहे. झाकुमीचे पिवळे अंग व हिरवे केस यजमान देशाच्या गणवेशाला साजेसे आहेत.

जून १६ हा झाकुमीचा वाढदिवस दक्षिण आफ्रिकेतील युवा दिन आहे. याच दिवशी दक्षिण आफ्रिकेचा दुसरा साखळी सामना खेळला जाईल. १९९४ हे झाकुमीचे जन्म वर्ष दक्षिण आफ्रिकेतील वंशभेद नसलेल्या सर्वप्रथम निवडणुकांचे प्रतीक आहे.

झाकुमीचा खेळ खिलाडुपणाचा. हे झाकुमीचे ब्रीदवाक्य आहे. २००९ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेदरम्यान हे ब्रीदवाक्य दाखवण्यात आले होते.
स्पर्धेचा चेंडू

    मुख्य पान: अदिदास जबुलानी

जबुलानी, २०१० फिफा विश्वचषकाचा अधिकृत चेंडू

अदिदास या कंपनीने तयार केलेला जबुलानी हा चेंडू स्पर्धेत वापरण्यात आला. इसिझुलू भाषेत जबुलानीचा अर्थ सगळ्यांना आनंदित करणारा असा होतो. तांत्रिकदृष्ट्या प्रगत असलेल्या या चेंडूत अकरा या आकड्याचे महत्व विशेष होते. अदिदासने तयार केलेला हा अकरावा अधिकृत चेंडू आहे. यावर खेळातील अकरा खेळाडू व दक्षिण आफ्रिकेतील अकरा राजमान्य भाषांचे प्रतीक असलेले अकरा रंग आहेत. ही स्पर्धा जूनच्या अकरा तारखेस सुरू होउन जुलैच्या अकरा तारखेला संपली.
या चेंडूवर टीकाही झाली आहे. एफ.सी. बार्सेलोनाच्या गोलरक्षक व्हिक्टर वाल्देसचे म्हणणे आहे की मला या चेंडूची भिती वाटते, हा बेभरवशाचा आहे.
पुरस्कार

गोल्डन बुटाचा पुरस्कार जिंकणार्‍या जर्मनीच्या थॉमस मुलरने तीन असिस्ट केले.
सोनेरी बुट विजेता -

सोनेरी बुट विजेता -       जर्मनी ध्वज थॉमस मुलर
सोनेरी चेंडू विजेता  -         उरुग्वे ध्वज दिएगो फोर्लन    
सोनेरी ग्लोव विजेता  -     स्पेन ध्वज एकर कासियास
सर्वोत्तम युवा खेळाडू -          स्पेन ध्वज एकर कासियास
फिफा फेयर प्ले ट्रॉफी
            जर्मनी ध्वज थॉमस मुलर     Flag of स्पेन स्पेन

No comments:

Post a Comment

Dear All This data is collected for our reference from various resources not for any commercial use .we are not responsible if any information is wrong..........Please Subscribe and Share your Information with all.