Get All MPSC News on your Email

Email     

Exam Paper Search

Friday, August 20, 2010

आंतरराष्ट्रीय करार व संमेलने

विविध आंतरराष्ट्रीय करार व संमेलने :
* डिसेंबर २००९ मध्ये पर्यावरण बदलासंबंधी बारा दिवसांचे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन. डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे आयोजित केली होती.
* नोव्हेंबर २००९ मध्ये भारत व कॅनडा या दोन देशांदरम्यान ऐतिहासिक परमाणू करार झाला.
* २७ ऑक्टो. २००९ रोजी भारत व नेपाळ देशांदरम्यान व्यापार करार झाला.
* अर्जेटिना हा सातवा देश आहे की भारताने आंतरिक्ष सहकार्य करार केला.
* भारत सरकारने राष्ट्रीय गंगा खोरे विकास प्राधिकरणाच्या बैठकीत 'डॉल्फिन' या प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी घोषित केले.
* ४ ते ६ मार्च २०१० रोजी दुबई येथे पार पडलेल्या दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मंगेश पाडगावकर तर स्वागताध्यक्ष धनंजय दातार होते.
* पुणे येथे होणाऱ्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द. भी. कुलकर्णी यांची निवड
* ऑक्टोबर २०१० मध्ये जगातील पहिल्या व्याघ्र शिखर परिषदेचे आयोजन भारत करणार असून ही परिषद राजस्थानातील रणथंबोर येथे पार पडणार आहे.
* पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन २००९ मध्ये सॅनहोजे अमेरिका येथे डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या संमेलनाचे घोषवाक्य होते, 'विश्वासी जडावे अवघे मराठी विश्व.'

No comments:

Post a Comment

Dear All This data is collected for our reference from various resources not for any commercial use .we are not responsible if any information is wrong..........Please Subscribe and Share your Information with all.